सावंतवाडी : वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांचे भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात बरेच दिवस बालरोग तज्ज्ञ पद रिक्त होते. त्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे लवकरात लवकर बालरोग तज्ज्ञ मिळावा म्हणून जनता मागणी करत होती. या मागणीला आता यश आले असून डॉ. संदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बालरोग तज्ज्ञ डॉ.संदीप सावंत हे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले, असे समजतात भाजपा स्थानिक नगरसेविका सौ. श्रेया मयेकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, बुथ प्रमुख रुपेश माडकर, युवा मोर्चाचे भूषण सारंग, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री यांनी रुग्णालयात जाऊन डॉ. सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आपल्याकडून नागरिकांना चांगली सेवा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली .





