मिलाग्रीस प्रशालेमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा.! ; मदर मेरी यांच्या जन्मदिनी विशेष प्रार्थना.

153

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये मदर मेरी ( Mother Of Jesus) यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेची विद्यार्थिनी कु . मेरीयान गोनसाल्वीस हिने मदर मेरी विषयी आपल्या भाषणात ओळख करून दिली. तर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी या दिवसाचे महत्त्व सांगुन सर्व विद्यार्थ्यांसाठी खास प्रार्थना केली. यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.