सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्धी ओम परब याची कुराश या खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ओमचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, क्रीडा मार्गदर्शक शेरॉन अल्फान्सो तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





