सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच देण्याची योजना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षीपासून जाहीर केली व त्याचे अंमलबजावणी ही सुरू केली.
यावर्षी 25 लाख रु. खर्चातून जिल्ह्यातील 200 भजनी मंडळांना हे भजनी संच दिले जाणार आहेत. या मंडळांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने आज ७ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. जि. प. सभागृहात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या योजनेला जिल्ह्यातील भजनी मंडळांनी चांगलाच प्रतिसाद दिला. जवळपास अडीच हजारवर भजनी मंडळांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.



