कणकवली : दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर (वय ५१) हे कणकवलीवरून दिगवळे गावी जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर आपली चारचाकी गाडी आडवी लावली. तसेच त्यांना थांबवत ‘तू कोणाला विचारून पक्ष सोडलास..? ‘अशी विचारणा करत तुझ्या निवडणुकीचा खर्च मी केला आहे. तू सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर तुला गावात व गावाबाहेर फिरू देणार नाही’, अशी धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत (नाटळ), मुकेश सावंत (कनेडी), तुषार गावकर (सांगवे) व अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांविरुद्ध कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





