कणकवली : सांस्कृतिक क्षेत्रात कणकवलीतील अनेक कलाकारांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ही बाब तुम्हा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून हा वारसा जपण्यासाठी लवकरच एसटीच्या बसस्थानक नजीक असलेल्या जागेत कला अकादमी उभारली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ऊरी पाऊस दाटला हा अल्बम तयार करण्याचे केलेले धाडस निश्चितपणे कौतुकास्पद असून हे संगीतप्रेमी भविष्यात नवीन अल्बम काढणार असतील तर त्यांना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
झाल्यापासून आजपर्यंत सिंधुदुर्गातील अनेक दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत केलेली असून त्यांच्या विश्वासावर आम्ही निःस्वार्थीपणे वृद्धांची सेवा करीत आहोत. जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी एक येऊन तयार केलेला ऊरी पाऊस दाटला’ या अल्बममधील गाणी रसिकांना हृदयात घर करू राहतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गाण्यांचा अल्बम करणे ही सोपी गोष्ट नाही, असे असतानाही जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ऊरी पाऊस दाटला हा अल्बम तयार करून शिवधनुष्य पेलेले असून हा अल्बम लवकरच फेमस होईल, असा विश्वास विलास खानोलकर यांनी व्यक्त केला. अभिषेक पवार यांनी हा अब्लम तयार केल्याबद्दल नीलेश पवार व त्यांच्या टीमचे कौतुक केले.





