दीपक डवर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.!

134

प्रा. रूपेश पाटील

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौन्दाळे बाऊळवाडी तालुका – देवगड, जिल्हा – सिंधुदुर्ग येथील उपक्रमशील सहाय्यक शिक्षक दीपक तानाजी डवर यांना प्राथमिक विभागातून महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते टाटा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास विभाग तथा पालकमंत्री मुंबई उपनगर श्री. मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधान परिषद सदस्य कपिल पाटील तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

दीपक डवर यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता M. A., B.Ed. M.A. Edu. झाले असून ते १४ वर्ष सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. श्री. डवर यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले असून ते महाराष्ट्र शासन राज्य नवोपक्रम स्पर्धा सन 2019-20 व 21 22 राज्यस्तरीय विजेता ठरले आहेत. तसेच  ग्लोबल शाळा व टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप कडून आंतरराष्ट्रीय सन्मान, अॅप निर्मिती मुलांना शिकवणारे राज्यातील पहिली शाळा बनवली,  इयत्ता सातवी /ठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये, राज्य व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात चतुर्थ क्रमांक,  20 पेक्षा अधिक शैक्षणिक अॅपच्या माध्यमातून शिक्षणाला आंतरक्रियात्मक बनवले. इंटर ऍक्टिव्ह कन्टेन्ट व डिजिटल रचनावाद या संकल्पना मांडून उत्तम प्रकारे क्रियांवरण केले. Diksha app च्या माध्यमातून कोर्स निर्मिती करून 30 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले. विद्या अमृत महोत्सव व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत राज्यात द्वितीय आले आहेत.

दीपक डवर यांना प्राथमिक विभागातून महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.