मुजोर झालेल्या ठेकेदार तसेच चालकांवर कारवाई का होत नाही.. ?

दोडामार्ग : खोक्रल ते मांगेली फणसवाडी तळेवाडी दरम्यान डांबरीकरण करण्यासाठी बाहेरील कामगार आहेत, त्यांना कामावर ने आण करण्याकरिता पर्यायी वाहनांची व्यवस्था न करता त्यांच्या जीवाशी खेळून खडी, डांबर घेऊन जात असलेल्याच गाडीतच नियमबाह्य पद्धतीने कामगारांना बसवून निष्काळजीपणे त्यांच्या जीवाशी खिलवाड करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित डंपर चालकावर अद्याप कारवाई झाली नाही. कामगारांची काळजी न करता फक्त आपली पोळी भाजली पाहिजे या हेतूने काम करणाऱ्या अशा मुजोर ठेकेदारावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.