सातारा : युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य या ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या संगठनेचा दि. ०३ सप्टेबर २०२३ रोजी सातारा जिल्ह्याच्या वतीने रत्नोदय मंगल कार्यालय सुरूर ता. वाई येथे संगठनेचे संस्थापक /अध्यक्ष इमरान पठान यांचे अध्यक्षतेखाली व राज्य कार्यकारीणीचे सचिव पुरुषोत्तम सदार यांचे मार्गदर्शना खाली सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील कदम, बाजीराव भोसले ( माजी सहाय्यक पो. आयुक्त ) तसेच सुरूर ग्राम पंचायत सरपंच शैला काळे, ग्रामपंचायत सदस्य निलम चव्हाण व पोलीस पाटील निर्मला पवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महापुरुषांच्या प्रतिमा पुजन करून व संस्थापक /अध्यक्ष पठान सर व सातारा जिल्हा अध्यक्ष कदम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. संगठनेचे राज्य सचिव सदार सर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर सातारा जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने उपस्थित सर्व राज्य भरातून आलेल्या युवाशक्ती ग्रामविकास संगठन च्या सर्व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संगठनेच्या कार्याचे कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने संगठनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत सातारा तालुका अध्यक्ष राजु सकटे, वाई तालुका अध्यक्ष दीपक पवार, खटाव तालुका अध्यक्ष सचिन भंडलकर, पाटण तालुका अध्यक्ष विजय जाधव, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष शिवराम चव्हाण तर कोरेगाव तालुका अध्यक्ष गोरख वाघ यांच्या निवडीची घोषणा राज्य कमिटीच्या उपस्थितीत केली आणि युवाशक्ती ग्रामविकास संगठन जिल्ह्यात गावागावात पोहचविण्याचा निर्धार केला.





