चांद्रयान लाँचिंगला काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला.! ; इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचे निधन..!

203

चेन्नई: भारताच्या चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. इस्रोच्या चांद्रयान-3 मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा त्यांचा होता. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेलं चांद्रयान-3 हे त्यांच्यासाठी अंतिम काऊंटडाऊन ठरलं.