बांदा : जलसंधारण विभागामार्फत बांदा तेरेखोल नदीपात्रात चार मीटर उंचीचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. धोत्रे आणि त्यांचे सहकारी सौरभ आहेर यांनी बांदा तेरेखोल नदीपात्राची पाहणी केली. पुढील वर्षीच्या मे महिन्या अखेरीस बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सदर कामामुळे जवळपास हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून याचा सरळ फायदा शेतकरी, बागायतदार तसेच नळपाणी योजनेला होणार आहे.
बांदा तेरेखोल नदी ही पावसाळी तुडुंब भरून वाहत असते पण ऐन उन्हाळात नदीपात्र हे कोरडे होऊन जातं असते त्यामुळे मागील अनेक वर्षे याठिकाणी नदीपात्रात बंधारा बांधावा याची मागणी केली जातं होती. अखेर शेवटी जलसंधारण विभागाने तुळसाण पूलानजीक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर करण्यात आल्याने बांदा, इन्सुलि, शेर्ले, वाफोली अश्या अनेक गावांना याचा फायदा होणार आहे. यासाठी स्थानिक शेतकरी , बागायतदार या उपक्रमाचे स्वागत नक्कीच करतील.
सदर बंधारा सर्वेक्षणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यासाठी जलसंधारण अधिकारी यांनी शुक्रवारी येऊन पाहणी केली यावेळी बांदा उपसरपंच जावेद खतीब, माजी उपसभापती शीतल राऊळ, शैलेश केसरकर, शामसुंदर मांजरेकर, दीपक सावंत, स्वागत नाटेकर आदी उपस्थित होते.





