मडुरा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जगन्नाथ परब..!

27

बांदा : मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी जगन्नाथ परब यांची निवड ग्रामसभेत करण्यात आली. हात उंचावून झालेल्या निवडणूक प्रक्रियेत जगन्नाथ परब यांनी विलास पावसकर यांचा एका मताने पराभव केला. सरपंच उदय चिंदरकर यांनी नूतन अध्यक्ष जगन्नाथ परब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
मडुरा ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा आरोग्य उपकेंद्रात संपन्न झाली. सभेत नवीन तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी जगन्नाथ परब व विलास पावसकर हे इच्छुक होते. अध्यक्ष निवडीवर एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. हात उंचावून झालेल्या प्रक्रियेत जगन्नाथ परब यांना १४ तर विलास पावसकर यांना १३ ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. बर्‍याच वेळाच्या चर्चेअंती सरपंच उदय चिंदरकर यांनी अध्यक्ष पदी जगन्नाथ परब यांची निवड जाहीर केली. त्यानंतर पावसकर समर्थकांनी सभात्याग केला.
यावेळी उपसरपंच बाळू गावडे, ग्रा. पं. सदस्य अमोल मेस्त्री, रेश्मा परब, स्वप्नाली परब, पल्लवी सातार्डेकर, माजी सोसायटी चेअरमन संतोष परब, उल्हास परब, दत्ताराम परब, नकुळ परब, रामा परब, विजय परब, प्रीतेश गवंडी, विनिता पावसकर, सोमनाथ परब, कृष्णा परब, नाना परब, रामदास गवंडी, लाडू परब, संदिप परब, सिद्धेश नाईक, शशिकांत परब, संतोष सोमा परब, मोहन गवस, ग्रामसेविका नेहा गवस, सीएचओ तेजस्विनी माजगावकर, पोलीस पाटील नितीन नाईक उपस्थित होते.
सभेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. ५०० रुपयांच्या वर थकीत पाणीपट्टी असलेल्यांचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.