सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाचा आपणास उपयोग होत असतो. त्यामुळे आपले जीवन योग्य मार्गाने पूर्ण होत असते. अशा समाजातील मदतनीसांचे ऋणानुबंध जपावे या सामाजिक बांधिलकीतून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
रक्षाबंधनासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस कर्मचारी श्री. जाधव, सैनिक अमोल सावंत,डॉ. प्रसाद नार्वेकर, सुतारकाम करणारे कारागीर प्रशांत राऊळ, शेतकरी बांधव संतोष पालव, शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रदीप सावंत इत्यादी आपले मदतनीस कार्यक्रमास उपस्थित होते. मुलांनी स्वतः बनवलेल्या राख्या सर्वांना बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षकअमित गोते सर यांनी मुलांशी छान गप्पा गोष्टी केल्या. मुलांची गाणी ऐकली. मुलांनीही छान संवाद साधला. यावेळी वर्गशिक्षिका श्रीम. स्वरा राऊळ व श्रीम. संजना आडेलकर तसेच श्री. वरक सर , श्री.अमित कांबळे सर, श्रीम. गुंजाळ मॅडम, श्रीम. बिले मॅडम, श्रीम. घाडीगावकर मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते.





