नवी दिल्ली : यंदा एशियन गेम्स 2023 स्पर्धेत वूमन्स आणि मेन्स क्रिकेट टीम इंडिया पहिल्यांदाच सहभागी होणारेत. चीनमध्ये एशियन गेम्स स्पर्धेचं आयोजन 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलंय. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे हेड कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉलिंग कोचची जबाबदारी साईराज बहुतुले, फिल्डिंग कोच म्हणून मनीष बाली, महिला क्रिकेट संघाचे कोच ऋषिकेश कानिटकर यासोबतच इतर कोचची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.


