मालवण – कुडाळचा पुढील आमदार भाजपचाच..! – बाळा गोसावी.

40

कुडाळ : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मालवण तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय?, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो? याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काम करावे, असा सणसणीत टोला भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हाणला आहे.

शिवसेना उद्धव गटाच्या मालवण तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला गोसावी यांनी उत्तर दिले आहे.