भजन रसिकांना खूषखबर..! ; झारापच्या श्री. देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भजनांची मेजवानी.

98

कुडाळ : श्री देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. श्रावणातील सप्ताह म्हणजे भक्तीला आलेला पूर. या भक्तिमय वातावरणात सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री. देवी भावई मंदिरात भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री.देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त, गुरूवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ठिक ७.०० वाजता सप्तसूर भजन मंडळ झारापचे सुप्रसिद्ध बुवा. श्री.संदेश सामंत यांचे सुश्राव्य भजन होणार असून रात्रौ ठिक ८.०० वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीचे बुवा श्री. रूपेश यमकर यांचे भजन व नंतर रामकृष्ण हरी भजन मंडळ, झाराप बुवा कु. साहिल बोभाटे हे भजनामृत शिंपडणार आहेत. शेवटी घाडीवाडी व बिडयेवाडी येथील सुप्रसिद्ध बुवा श्री. दादा मांजरेकर व श्री. संजय बिडये यांचे भजन होणार आहे.
तरी सर्व भजन रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री.देवी भावई देवस्थान समितीने केली आहे.