इन्सुलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला तेरेखोल नदीपात्रात..!

126

बांदा : इन्सुली – गावडेवाडी येथील बेपत्ता महिला रुक्मिणी नारायण गावडे (वय ४७) यांचा मृतदेह आज सकाळी तेरेखोल नदीत तुळसाण पुलानजीक आढळून आला. त्या गुरुवार संध्याकाळपासून बेपत्ता होत्या. नातलगांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध करुनही आढळून न आल्याने काल सायंकाळी बांदा पोलीसात फिर्याद दाखल केली होती. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल सिताकांत नाईक, नरेंद्र कुडतरकर आदींसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. इन्सुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.त्याच्या पच्यात पती दोन मुलगे आदी परिवार आहें