मळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धेत डंका…..! ; राष्ट्रीय स्तरावर निवड.

173

सावंतवाडी : नॅशनल स्टीम ( मिनी सायन्स)चॅलेंज २०२२- २०२३ मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत मॉडेल मेकिंग यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कु. नारायण विद्याधर मांजरेकर या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला व पुढील स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर याची निवड झाली. तसेच या स्पर्धेत राज्यस्तरावर कु. रोहन परब या विद्यार्थ्याने ही सहभाग दर्शविला होता.

  1. या स्पर्धेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील ग्रंथपाल सतीश राऊळ तसेच संगणक निदेशक रीतेश राऊळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे खजिनदार  नंदकिशोर राऊळ प्रत्यक्ष येऊन मुलांचे कौतुक केले.
    यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, संस्था सदस्य पांडुरंग कृष्ण नाटेकर (बाप्पा नाटेकर), श्री. केळुसकर तसेच शाळा कमिटी चेअरमन  मनोहर राऊळ, शिक्षण सल्लागार वैजनाथ देवण,  शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.