सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ स्नेहल उदय जामदार यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे सरपंच व सदस्य पद कोकण विभागीय आयुक्त यांनी रद्द केले आहे.याबाबत सखाराम नरहरी गावकर व इतर २३ ग्रामस्थ, रा. मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांनी तक्रार दाखल केली होती.या तक्रार अर्जान्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सावंतवाडी यांनी चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना अहवाल सादर केला. सदर अहवालाच्या अनुषंगाने श्रीम. स्नेहल उदय जमादार, सरपंच, ग्रामपंचायत मळगाव, ता. सावंतवाडी यांनी ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करताना कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) अन्य कारवाईसाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता.या अहवालानुसार कोकण विभागीय आयुक्त यांनी मळगाव सरपंच स्नेहल उदय जामदार यांना सरपंच व सदस्य पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
त्यांच्यावर पुढीलप्रमाणे दोषारोप निश्चित करुन निर्णय देण्यात आला आहे.
१)सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील १४ वा वित्त आयोगांतर्गत रु.५,३३,००१/- रकमेची अनियमितता करणे.
२)सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील ग्रामनिधीअंतर्गत रु.१,८५,१०१/- रकमेची अनियमितता करणे.
3)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) अन्वये श्रीम. स्नेहल उदय जमादार, सरपंच, ग्रामपंचायत मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांना त्यांच्या सरपंच तसेच सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत आहे.
4). प्रस्तुत प्रकरणी झालेली अनियमिततेची रक्कम संबंधित जबाबदार असणारे सरपंच व ग्रामसेवककडून वसूल करा




