: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘रॉकेट्री’ हा हिंदी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर ‘एकदा काय झालं’, ‘चंद सासें’, गोदावरी या मराठी सिनेमांनीही आपली मोहोर उमटवली. या पुरस्कारांमध्ये सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा घोषित करण्यात आला. गोदावरीचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर गंगुबाई काठियावाडी या सिनेमासाठी अलिया भट हीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
मिमीसाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रॉकेट्री हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तसेच चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सासें’ या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक सिनेमा म्हणून पुरस्कार घोषित झाला आहे.
कोणाला मिळाला कुठला पुरस्कार? पाहा यादी
सर्वोत्कृष्ट हिंदो सिनेमा- सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा-एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १
सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जून
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’





