सावंतवाडी : तालुक्यातील शेर्ले जाधववाडीतील नारायण वामन जाधव हे मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताहेत. स्वतःचं घर असावं, असे मनी स्वप्न बाळगून त्यांनी कुटुंबाच्या गरजा भागवत असताना पैशांची बचत करत करत स्वतःच चिरेबंदी घर उभ केलेलं आहे. घरात पाच माणसं. त्यात मुलांचं शिक्षण, अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना उर्वरित घराच राहिलेलं छप्पराच काम अपूर राहिलेलं आहे. त्यासाठी एक लाख रुपयांची गरज आहे. यासाठी जाधव कुटुंबाने मदतीचा हात मागितला आहे.
नारायण वामन जाधव यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी नयना जाधव, मुलगा प्रथमेश, मुली प्रियांका, कावेरी असा परिवार आहे. नारायण जाधव हे गवंडी काम करतात. हाताला काम मिळेल त्यांच्यासोबत जाऊन मजुरी करतात. त्यातून मिळालेल्या मजुरीतून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवीत आहेत. सध्या ते त्यांचे भाऊ अंकुश जाधव यांच्या घरी राहतात. भाऊ अंकुश जाधव यांचं छोटस घर आहे. भावाचे कुटुंब, त्यात नारायण जाधव यांच पाच जणांच कुटुंब. त्यामुळे अनेक अडचणी.. आपलं स्वतःचं घर असावं म्हणून नारायण जाधव यांनी जमेल तस चिरे आणून घराच्या भिंती उभ्या केल्या आहेत. आता मात्र उर्वरित घराचं छप्पर करण्यासाठी हातात पैसे नाहीत. करायचं काय? कोणाकडे अपेक्षा करणार? अशा विवंचनेत सदया जाधव कुटुंब आहे.
मोलमजुरीतून मिळालेल्या पैशातून काटकसर करत करत त्यांनी घर उभ केलं आहे. कुटुंबाच्या गरजा त्यात मुलांचं शिक्षण, कमावती व्यक्ती मात्र एक, अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती एकदम हालाखीची बनलेली आहे. त्यामुळे घराचं उर्वरित छप्पराच काम राहिलेल आहे. त्यासाठी नारायण जाधव यांना साधारण एक लाख रुपयांची गरज आहे. तेवढी जर का गरज झाली तर आम्ही जे आमचं स्वतःच्या घराच स्वप्न पाहात आहोत ते पूर्ण होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जाधव यांच्या घरी ज्या ज्या व्यक्ती येतात, त्यांना ते आपली व्यथा सांगत आहेत. घर पूर्ण करण्यासाठी आमच्याजवळ एवढी रक्कम नाही. आम्हाला आर्थिक मदत करा, अशी नारायण जाधव व त्यांची पत्नी नयना जाधव या हात जोडून विनंती करत आहेत.
तरी कृपया दानशूर व्यक्तींनी जाधव कुटुंबाला उभारी देण्यासाठी पुढील अकाऊंटवर आपली आर्थिक मदत पाठवावी, असे आवाहन समाज माध्यम म्हणून करीत आहोत.
मदतीसाठी :- नाव : नयना नारायण जाधव
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.,सिंधुदुर्ग
शाखा : बांदा, IFS कोड : SIDC0001023, A/ C क्रमांक. 023400000013619 मो.नं. 9119422191





