अंगदुखी सदृश्य लक्षणे असल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा..! ; डॉ. महेश जाधव यांचे डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आवाहन.

50

आंबोली : डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर कोरडा दिवस पाळण्याबरोबर परिसरात मच्छर न होण्यासाठी खबरदारी घेण्याचे, तसेच ताप, अंगदुखी सदृश्य लक्षणे असल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असे आवाहन येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी केले आहे.

येथील आंबोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत चौकुळ, मळववाडी आणि चुरणीची मूस येथे दोन रुग्ण डेंग्यूचे आढळले असून आणखी ७-८ नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत. त्यात आणखीही मिळू शकतात. त्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करून स्पॉट व्हिजिट देखील केली आहे. आवश्यक सूचना या अनुषंगाने केल्या आहेत.तरी नागरिकांनी ताप,डोकेदुखी,अंगदुखी,थकवा,मळमळ,उलटी,सांधेदुखी असल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. कोरडा दिवस पाळावा.घरातील भांडी उलटी करून ठेवावी.आजूबाजूला करवंटी,टायर तसेच दूषित पाणी साचू देऊ नका.मच्छर होणार नाहीत याची खबरदारी घ्या. टायफॉईड चे रुग्ण सापडत असल्याने पाणी उखळून प्या.मेडिक्लोर किंवा क्लोराईड पावडर पाण्यात टाका.पाणी शुद्धीकरण करा.दूषित अन्न खाऊ नका.असे आवाहन येथील डॉक्टर महेश जाधव यांनी केले आहे