सावंतवाडी : सावंतवाडी येथील जुना आयटीआयकडे एका अज्ञात कारचालकाने 80 वर्षीय एका वृद्ध महिलेला मागून धडक देवून तो गोव्याच्या दिशेने पसार झाला आहे. परंतु सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. सदर चालकाचा याचाही शोध पोलीस घेत आहे. सदर वृद्ध महिला नातेवाईकासोबत डॉक्टरांकडे आली होती. तेव्हा तिचा हा अपघात झाला याची सविस्तर माहिती तत्काळ सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी पोलीस स्टेशन दिली आहे व सदर वृद्ध महिलेला सत्यभामा कळंगुटकर हिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक बांधिलकीची कार्यकर्ती रूपाली मुद्राळे, रवी जाधव , ट्राफिक हवालदार बोर्डेकर यांच्या सौभाग्यवती सुनीता बोर्डेकर यानी ऑटो रिक्षा मध्ये घालून तत्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे सदर वृद्ध महिलेच्या कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली असून ती सध्य:स्थितीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. या वृद्ध महिलेला ठोकर देऊन पसार झालेल्या ब्ल्यू कलर कारचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन सहकार्य केले.






