सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस शिरोडा नाका येथील साहस दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी येथील दिव्यांग मुलांसोबत त्यांनी केक कापला. तसेच खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. दिव्यांग मुलांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पुंडलिक दळवी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. वाढदिनी दिलेल्या या शुभेच्छांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अधिक बोलूही शकणार नाही, अशी भावना व्यक्त करत पुंडलिक दळवींनी सर्व मुलांचे व संस्थेचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, उद्योग व्यापार सेलचे तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, धोंडी दळवी, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, याकुब शेख, त्यांची सुकन्या श्रीया दळवी, व चिरंजीव भुवन दळवी आदी उपस्थित होते.





