सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपला वाढदिवस सावंतवाडीतील शिरोडा नाका येथील दिव्यांग विकास केंद्रात जाऊन साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या श्रीया देखील होती. दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग मुलांची अवस्था पाहून पुंडलिक दळवी हे संवेदनशील झाले. यावेळी त्यांची कन्या श्रीया हिला देखील दिव्यांग बांधवांचे ते हाल अपेष्टा पाहून अश्रू अनावर झाले. सामाजिक जीवनात पुंडलिक दळवी संवेदनशील आहेतच याचा अनेक वेळा प्रत्यय आलाय. मात्र त्यांची कन्या श्रीया दळवी हिचे दिव्यांग बालकांसोबत वाढदिवस साजरा करत असताना डोळ्यांतील अश्रू थांबेनाच. श्रीयाच्या डोळ्यात आलेले हे अश्रू दळवी कुटुंबीयांची संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली भावुकता प्रकट करत होती. श्रीयाच्या डोळ्यातील अश्रू पाहून तेथे उपस्थित असलेल्यांचे डोळे देखील आपसूकच पाणावले.





