हडपिडच्या श्री स्वामी समर्थ मठात एक दिवसीय अखंड स्वामी नामजप सोहळा ; श्रावण मासाच्या पहिल्या गुरुवारी केले आयोजन.

73

देवगड : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित, श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारचे औचित्य साधून प्रथमच एक दिवसीय श्री स्वामी समर्थ नामाचा जागर होणार आहे.

गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७ ते शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७ पर्यंत असा अखंड २४ तास नामजप होणार आहे.या एक दिवसीय नामजप कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे व अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त मठाचे सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.