न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे वृक्षारोपण..!

46

बांदा : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे हरित सेनेद्वारा शालेय परिसरात वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर, शालेय समिती तथा समन्वय समिती सदस्य भिकाजी धुरी, तसेच शालेय समिती सदस्य मंगलताई कामत, सौ. वालावलकर, शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी, श्रीकृष्ण भोगले, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.