पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न होणे हा स्वातंत्र्य सैनिकांसह जनतेचाही अवमान : डाॅ. जयेंद्र परुळेकर.

34

सावंतवाडी : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सध्या देशात अमृतकाल चालू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीच्या १५ ऑगस्ट या पवित्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण हे मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होत नाहीये.
हा जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचा तसेच स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान नाही का?, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच होणे हे गरजेचे आहे, अशावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे कसं काय अशा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणार, हा खेळ आहे का? असा सवाल सवाल ठाकरे शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे उपस्थित केला.