खळबळजनक… सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह आढळला मंदिराजवळील रस्त्यावर..!

266

मदुराई : कमल हसन यांच्या ‘अपूर्व सगोधररगल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मोहन यांचे निधन झाले आहे. मोहन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. अनेक चित्रपटांमध्ये त्यांची अभिनेता म्हणून काम केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 60 वर्षीय मोहनचा मृतदेह मदुराईच्या थिरुपरकुंडरम मंदिराजवळील रस्त्यावर आढळून आला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ते मदुराईमध्ये भीक मागताना दिसले होते. आता मोहन यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन अजूनही कामाच्या शोधात होते. त्यांची आर्थिक खूप दयनीय झाली होई. सेलम जिल्ह्यातील मेत्तूर येथील रहिवासी असलेल्या मोहन यांना चित्रपटसृष्टीत पाय रोवायचे होते आणि त्यासाठी तो सतत धडपडत होता.

वृत्तानुसार, 31 जुलै रोजी स्थानिक लोकांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मदुराई येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर पीडित, अभिनेता मोहन असल्याचे समजले.

शवविच्छेदनात अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही आणि मोहनची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर अभिनेत्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.