चिठ्ठी लिहून त्याने महिलेच्या अंगावर फेकली | प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलं

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील एका कॉलनीत महिलेचा विनयभंग झाला आहे. यात संशयिताने आपल्याला मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. हा प्रकार १५ जानेवारीला रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेच्या अंगावर संशयिताने काहीतरी मजकूर लिहून चिठ्ठी फेकल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणाची संबंधित महिला आपल्या बहिणी सोबत बोलणी करत असताना संशयिताने ही मारहाण व शिवीगाळ केली. तसेच त्या महिलेच्या बहिणीलाही संशयिताकडून धक्काबुक्की झाल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.