सावंतवाडी : ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, विद्याधर भागवत यांचे साहित्यिक योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून ‘आरती मासिक ‘ कोमसाप-शाखा, सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी, यांचे संयुक्त विद्यमाने, भागवत सरांच्या स्मरणार्थ खुली ‘स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली जाते.
यावर्षी ही स्पर्धा रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. कविता स्वरचित असावी. मराठी असावी, एका कवीला एकच कविता सादर करता येईल. अठरा वर्षा वरील स्पर्धकांनी भाग घ्यावा. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये पाचशे, तीनशे, दोनशे व दोन उत्तेजनार्थ रुपये शंभर व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येईल.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपली नावे कवयित्री उषा परब (९४२३८१८८२८) यांच्या कडे २२ ऑगस्ट पर्यन्त घ्यावी. गोवा, सिंधुदुर्ग भागातील कवीनी भाग घ्यावा,असे आवाहन प्रभाकर भागवत, उषा परब, भरत गावडे यांनी केले आहे.





