न्यूयॉर्क : एकनाथ शिंदे यांनी वर्षापूर्वी शिवसेनेत मोठं बंड केलं होतं. या बंडानंतर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यांच्या विविध कार्याचे फोटो आता सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. आता चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकला आहे. न्यूयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर शिंदेंचा फोटो झळकताना दिसत आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते आहेत, ज्यांचा फोटो टाईम्स स्क्वेअरवर प्रथमच झळकला आहे. राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम न्यूयॅार्कमध्ये राबवण्यात आला आहे.
राहुल कनाल यांनी नुकताच शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो न्यूयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले आहेत. त्यामुळं CM शिंदेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे





