सावंतवाडी : शेतात काढलेली भाजी नदीत धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सांगेली येथे घडली.
मधुकर काशीराम सावंत (वय ६५) असे दुर्दैवी शेतकरीचे नाव आहे. त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.





