नवी दिल्ली : जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांसाठी भारत हा सर्वात मोठा देश म्हणून उदयास आला आहे आणि आता आगामी काळात ड्रॅगन म्हणजेच चीनला मागे टाकण्याची क्षमता भारतात आहे. ग्लोबल बँकिंग फर्म मॉर्गन स्टॅन्लेने भारताला त्यांच्या इमर्जिंग मार्केट लिस्टमध्ये चांगले रेटींग दिले आहे तर चीनचे रेटीं कमी केले आहे. उदयोन्मुख बाजारपेठांच्या यादीत भारताने मोठी झेप घेतली आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, भारताचे दरडोई उत्पन्न सध्या केवळ 2,500 डॉलर आहे तर चीनचे 12,700 डॉलर आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांनी सांगितले की, भारत दीर्घकालीन तेजीच्या मार्गावर आहे, तर चीनमधील ही तेजी आता संपणार आहे.
कोविडनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने वेग पकडला
मॉर्गन स्टॅन्ले विश्लेषकांच्या मते, भारताचे कर्ज GDP च्या 19 टक्के आहे तर चीनचे 48 टक्के आहे. तसेच, जीवन विमा पॉलिसी फक्त 2 टक्के भारतीय कुटुंबांकडे उपलब्ध आहे. कोविडचे निर्बंध हटवल्यानंतर भारतात उत्पादन आणि सेवा पीएमआयमध्ये वाढ झाली आहे, तर चीनमध्ये झपाट्याने घट झाली आहे. भारतात रिअल इस्टेट व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. मॉर्गन स्टॅनले अर्थशास्त्रज्ञ मानतात की चीनचा जीडीपी वाढीचा दर केवळ 3.9 टक्के असेल तर भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के असेल.





