सावंतवाडी : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवलीतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांना सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. डॉ. पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. संजीव लिंगवत, ज्येष्ठ पत्रकार देवयानी वरसकर, ‘अन्यायरहित जिंदगी’चे अरुण पांडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभाला गोव्यातील ज्येष्ठ लेखक श्री. जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, राजेश मोंडकर, मंगल कामत, यांच्यासह साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सरिता पवार यांनी केले.





