संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा | देवगड भाजपची पोलीस स्थानकात धाव

देवगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर खासदार संजय राऊत यांनी अपशब्द वापरून मानहानीकारक अपमान केला आहे, त्याचा निषेध म्हणून देवगड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देवगड पोलिस स्थानकात देण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे, यावेळी भाजप देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश राणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, नगरसेवक शरद ठूकरुल, शैलेश लोके, गोविंद सावंत, उत्तम बिर्जे, नगरसेविका अँड सौ प्रणाली माने, योगेश पाटकर, दयानंद पाटील, सरपंच महेश राणे, महेश जंगले, मिलिंद माने, नरेंद्र भाबल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.