गोव्यातील भीषण अपघातात सावंतवाडीतल्या “या” गावातला युवक जागीच ठार…!

सावंतवाडी : धारगळ पेडणे येथे आज दुपारी दुचाकीचा एक भीषण अपघात झाला. या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला मात्र घटनास्थळी रुग्णवाहिका येण्यास उशिर झाल्याने युवकाचा मृत्यू झाला असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मृत दुचाकीस्वार सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील असल्याचे समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने वासुदेव पेडणेकर २५ रा. निरवडे हा युवक दुचाकीवरुन घसरुन महामार्गाच्या दुभाजाकाजवळील सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, तो खांब तुटला.

या अपघातात दुचाकीस्वार वासुदेव पेडणेकर याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. महामार्गावरील प्रवाशांनी व स्थानिकांनी जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला दरम्यान रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या ओळखपत्रावरून वासुदेव हा गोव्यातील एका कंपनीत कामाला होता. तो गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला युवकांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.