सावंतवाडीत आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांकडून मणिपूर घटनेचा निषेध..!

87

सावंतवाडी : 4 मे रोजी मणिपूर येथे एका समाजाकडून काही महिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध मंगळवारी सावंतवाडी येथे आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला. याबाबत लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान याबाबत राष्ट्रपतींना निवेदन देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला, मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची सभा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात मंगळवारी सायंकाळी घेण्यात आली. यावेळी प्रारंभी मोहन जाधव यांनी या घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी सांगून आपण सर्वांनी निषेध कसा करावा याबाबत चर्चा करावी असे मागणी केली.

यावेळी प्रा.डाॅ.देविदास बोर्डे ,अॅड. एस. व्ही. कांबळे, पत्रकार मोहन जाधव , परेश जाधव,बार्टी समतादूत सगुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव, महिला कार्यकर्त्या सत्वशिला बोर्डे ईत्यादींनी चर्चेत भाग घेऊन याबाबतीत एक तातडीने निवेदन तयार करून राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन द्यावे असे सुचित केले व लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन यापुढे आंदोलनाची दिशा ठरविण्यात यावी असे निश्चित करण्यात आले.