सावंतवाडी : आज निरुखेवाडी येथे सकाळी सात वाजता रस्त्यावर झाड पडल्याची कल्पना सामाजिक बांधिलकीला नगर परिषदेची कर्मचारी परवीन शेख यांनी दिली.
त्यानंतर सामाजिक बांधिलकीची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश सांगेलकर हे त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करत होते. त्यांच्यासोबतच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, श्याम हळदणकर व सुजय सावंत यांनी झाड तोडून हटवण्यास मदत केली. परंतु झाड खूप मोठे असल्याकारणाने महेंद्र सांगेलकर यांनी संकेत मुंडये यांच्या मालकीचा जेसीबी मागून संकेत मुंडये यांनी सदर मोठे झाड रस्त्यावरून हटवण्याचे विनामूल्य मोठे कार्य केले.
त्याप्रसंगी पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर यांनी रस्त्यावरील ट्राफिक सुरळीत केली. तसेच ग्रामस्थ बाबा शिंदे , मोहन ठाकूर व विजय बहादूर हे रस्त्यावरील झाड हटवण्याच्या कामी कार्यरत होते. माहिती अशी मिळाली होती की याच मार्गाने आज सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ताफा जाणार होता. त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले.





