नवी दिल्ली: तुम्ही पॅन आणि आधार कार्ड वापरत असाल आणि तुम्ही अजूनही तुमचा पॅन नंबर आधारशी लिंक केला नसेल, तर वेळ वाया न घालवता लगेचच ते करून घ्या नाहीतर १ एप्रिलपासून तुमचा पॅन नंबर निष्क्रिय होईल. इन्कम टॅक्स विभागाने देखील करदात्यांसाठी नोटीस जारी केली आहे. यानुसार आयकर विभागाने ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत बहुतांश पॅन कार्डधारकांनी आपले पॅन आधारशी लिंक केले आहे, पण अजूनही असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.





