विजापूर पंढरपूर रस्त्यावर बस पलटी | 1 ठार , 35 जखमी

सोलापूर : विजापूर पंढरपूर रस्त्यावर आज सकाळी एका बसचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस जागेवरच पलटी झाली त्यामध्ये सुमारे 35 प्रवासी हे जखमी असून एक प्रवासी जागेवर ठार झाला आहे. हे सर्व प्रवासी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येत होते.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील हे सर्व प्रवासी असून एका खाजगी यात्रा कंपनीच्या बसमधून हे तीर्थयात्रा स्थळी प्रवास करीत होते. जखमी प्रवाशांवर सोलापूर आणि मंगळवेढा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील आठ प्रवासी हे गंभीररित्या जखमी आहेत तर उर्वरित सर्व प्रवाशांना किरकोळ जखमा आहेत.