आकेरीच्या जयेश धुरीच्या कलाकुसुरीने वेधलं राज्याचं लक्ष…!

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचा जयेश धुरी याने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. लहान वयातच अद्भूत अदाकारी दाखवत आकेरी या छोट्याशा गावातील युवा शिल्पकार जयेश धुरी या विद्यार्थ्याने अख्ख्या महाराष्ट्राला ओळख दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग कला संचालनालयातर्फे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ६२ व्या राज्य कला प्रदर्शनातील शिल्पकला स्पर्धेत राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक कला महाविद्यालये सहभागी झाली होती. या स्पर्धेत विद्यार्थी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात शिकत असलेल्या जयेशने आपल्या अद्भुत कलेने प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावत राज्यभरातील शिल्पकारांचे लक्ष वेथून घेतले. हुबेहूब कलाकृती साकारत सुवर्णपदक पटकावलं आहे.

पुढील महिन्यातील तीन तारखेला जयेशला प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक, सन्मानपत्र व महाराष्ट्र शासनाच्या रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग वासीयांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. लहानपणापासूनच चित्रकला, शिल्पकलेची आवड जयेशला होती.