आ. देशमुख ACB च्या चौकशीच्या फेऱ्यात…!

अमरावती : ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे . यानंतर आता अमरावती बाळापूरचे आमदार नितीन देशमुख ही एसीबीच्या रडारवर आले आहेत. बाळापुर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे आज बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी येथील ACB कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून नितीन देशमुख यांच्या संपत्तीची बारकाईने माहिती घेणे सुरू असून एसीबी कार्यालया बाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. जोपर्यंत नितीन देशमुख बाहेर येणार नाहीत तोपर्यंत कार्यालया बाहेरुन हटणार नाही अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. दरम्यान
ACB च्या अधिकार्‍यांना चौकशीमधे मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी एसीबी कार्यालया परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.