विरोधी पक्षनेते पदासाठी ‘या’ नेत्याचे थेट हायकमांडला पत्र, 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा?

29

मुंबई : विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असतील याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी हायकमांड आणि अध्यक्षांना पत्र लिहल्याची चर्चा आहे. थोपटे भोरचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण वाढल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. यांनतर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोण असेल, अशी चर्चा सुरू आहे.

संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण वाढल्याची चर्चा आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी ३० आमदारांचा पाठींबा असल्याचे पत्र हायकमांडला पाठवल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रसने विधानभवनात बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज या पदासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.