तिर्लोट नवानगर येथील मोहरम मिरवणूक मार्गाची स. पो. नि. हेमंत देवरे यांनी केली पहाणी

देवगड : सहयाद्रीच्या पट्ट्यात धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगर व नदी शेजारी गावातील लोक खबरदारी घेत आहेत. विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हेमंत देवरे यांनी तिर्लोट नवानगर येथील मुस्लिम वाडी येथे आगामी मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी करून उपस्थित नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सतत होणाऱ्या पावसाबाबत सुरक्षितेच्या अनुषंगाने उपस्थित ग्रामस्थांना सूचना देखील दिल्या . यावेळी अन्य पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.