आरोस-दांडेली येथे नूतन तलाठी वर्षा नाडकर्णी यांचे ‘मनसे’ स्वागत

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस-दांडेली येथे नूतन तलाठी वर्षा नाडकर्णी यांचे मनसे शाखा आरोसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांना योग्य ती सेवा देण्याचे आश्वासन सौ. नाडकर्णी यांनी दिले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नेट अभावी ग्रामस्थांना जमिंनविषयक कागदपत्रे देताना अडचणी निर्माण होत असल्याचे तलाठ्यांनी सांगितले. या बीएसएनएल मध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करून तलाठी कार्यालयात ब्रॉड बॅण्ड सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे मनसे पदाधिकारी यांनी दिले आश्वासन. यावेळी उपस्थित माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक मा शाखाअध्यक्ष प्रवीण आरोस्कर नंदू परब मुकुंद धारगळकर श्री अंकुश आरोस्कर सुभाष नाईक व इतर मन सैनिक उपस्थित होते.