मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवून दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यातच अंबरनाथ लोकल बंद पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होती. अचानक त्या काकाच्या हातून चार महिनाचे बाळ सटकले आणि वाहत्या पाण्यात वाहून गेलं.
मुलाची आई आणि त्याचे काका लोकल बंद पडल्याने लोकल ट्रेनच्या बाजुने चालत निघाले होते. मात्र त्याचवेळी काकाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ हातातून सटकलं. ते वाहत्या पण्यात वाहून गेलं.





