BIG BREAKING…!विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता युपीए नव्हे ‘INDIA’

62

बंगळुरू : बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार करण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे,
नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात I- Indian, N – National, D-Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.