सावंतवाडी रुग्णालयाचे नवनियुक्त स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ऐवळे यांचे ‘मनसे ‘ स्वागत!

57

सावंतवाडी : मनसेच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सेवानिवृत्त झाले त्यानंतर डॉ. श्री ऐवळे यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले व येथील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. डॉ ऐवळे यांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच मनसेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, माजी विभागाध्यक्ष मंदार नाईक, रस्ते आस्थापना उपजिल्हा संघटक अभय देसाई, नंदू परब, प्रमोद तावडे, सुरेंद्र कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.