सावंतवाडी : विद्यार्थ्यानी नेहमी मोठे ध्येय ठेवून ते मिलवन्याचा सतत प्रयत्न करावा असे विचार डॉ सुभाष सावंत लक्ष्मीबाई सिताराम हलबे महाविद्यालयाचे प्राचार्य यानी नूतन माध्यमिक विद्यालय येथील शालेय विद्यार्थी याना मार्गदर्शन करताना मांडले. नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस एस सी बैच १९९२ च्या वतीने शालेय विद्यार्थी यांचे साठी आयोजित “शैक्षणिक व रोज़गराच्या संधि” या विषयावर आधारित व्याख्यानमलेत व्याख्यान देताना ते बोलत होते.
नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस एस सी बैच १९९२ ने हा उपक्रम हाती घेतला असुन शनिवार दिनांक १५/०७/२०२३ रोज़ी पहिले व्याख्यान डॉ सुभाष सावंत व त्यांचे सहकारी डॉ सोपान जाधव यानी देवून विद्यार्थी याना उपलब्ध शैक्षणिक सन्धीयाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मूलिक सर, संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक सावंत व त्यांचे सहकारी सदस्य, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संखेंने उपस्थित होते.या कार्यक्रमात एस एस सी बैच १९९२ च्या वतीने दहावी इयत्तेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, माध्यमिक शालांत परीक्षेत शिष्यवृत्ति मिलवनारया विद्यार्थी यांचा सत्कार तसेच, गरजू मुलाना गणवेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे विद्यार्थी पालक व शिक्षक यांचेकडन कौतुक होत आहें.





